मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ‘ज्ञानोबा माऊली तुकारामा’च्या गजराने दुमदुमाला दिवे घाट; पहा क्षणचित्रे

‘ज्ञानोबा माऊली तुकारामा’च्या गजराने दुमदुमाला दिवे घाट; पहा क्षणचित्रे

Jun 25, 2022 08:46 PM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • हरिओम विठ्ठला, ज्ञानोबा-माऊली तुकाराम, पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली, माऊली अशा अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागमोडी वळणाचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लीलया पार केला.

पुण्यातील गुरुवारचा मुक्काम आटोपल्यानंतरर ‘एवढा करा उपकार! देवा सांगा नमस्कार’ असे म्हणत शहरातील भक्तांनी पालखी सोहळ्याला साश्रू नयनांनी निरोप दिला.पालखी सोहळ्याने हरिनामाच्या गजरात हा घाट सायंकाळी ५ वाजता पार केला. रात्री ९ च्या सुमारास हा सोहळा सासवडला पोहचला. यावेळी सासवडकरांनी जल्लोषात या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

दिवे घाटातील हिरवाईन वारकऱ्यांना चालण्याची शक्ती मिळत होती. ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटली होती, अशीच अनुभूती येत होती.(फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

अवघड असा दिवे घाट टाळ मृदुगांच्या गजरात भक्तिमय वातावरणात वारक-यांनी लिलया पार केला. शुक्रवारी पुण्यातील विश्रांतीनंतर शुक्रवारी मजल दरमजल करत हा सोहळा सोपानकाकांच्या सासवडनगरीच्या दर्शनाची ओढीने पुढे जात होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

वडकी येथे पोहचल्यावर माऊलींना पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला. हडपसर येथे विसावा घेतल्यानंतर दिवे घाटाची अवघड चढण सुरू झाली.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी आणि विठू नामाच्या गजरात माऊलींचे स्वागत करण्यात आले.  (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी आणि विठू नामाच्या गजरात माऊलींचे स्वागत करण्यात आले.  (फोटो- प्रथम गोखले / हिंदुस्तान टाईम्स)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज