Sankashti Chaturthi January 2024 : सोमवार २९ जानेवारी २०२४ रोजी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे. या दिवशी, १०० वर्षांनंतर, एक दुर्मिळ योगायोग घडतो आहे. या दुर्मीळ योगाचा फायदा कोणाला होईल व कोणत्या राशींवर बाप्पाची खास कृपा होईल, जाणून घ्या.
(1 / 6)
संकष्टी चतुर्थीचे व्रत मुलांच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी पाळले जाते. या वेळी १०० वर्षांनंतर संकष्ट चतुर्थीचा उपवासाच्या दिवशी मंगळ, शुक्र आणि बुध धनु राशीत असतील. यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. याशिवाय शोभन योगही राहील.(HT)
(2 / 6)
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शुभ योगांच्या संयोगाने तूळ,वृश्चिक, कुंभ व मीन राशीच्या लोकांच्या व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील. बाप्पाच्या कृपेने त्यांना आर्थिक लाभ होईल.
(3 / 6)
वृश्चिकवृश्चिक राशीसाठी शुभ संयोग लाभदायक आहे. तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही शुभ संधी आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने सर्व अडथळे दूर होतात. या दिवशी श्रीगणेशाला शेंदूर अर्पण करा आणि गणेश अथर्वशीषाचा पाठ करा.
(4 / 6)
मीनमीन राशीच्या लोकांना सकट चौथच्या दिवशी घडणाऱ्या दुर्मिळ योगायोगाचा फायदा होईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. तब्येतही सुधारेल.
(5 / 6)
तूळजीवनात सुख-समृद्धी येईल. गणपतीची कृपा सर्व कार्यात यश मिळवून देणारी राहील. काही दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणी दूर होतील. व्यवसाय विस्ताराच्या संधी आहेत. धनलाभाचे नवीन स्त्रोत तयार होतील.
(6 / 6)
कुंभपैसे कमवण्यासाठी नवीन मार्ग मिळतील. समाजात मान-सन्मान मिळेल. आर्थिक वृद्धी होईल. घरात एखाद्या मंगलकार्याचे आयोजन केले जाईल. जीवनात सुख-सुविधा राहील.