'ए मामू' म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे संजय दत्त. आज संजय दत्त ६५ वर्षांचा असला तरी त्याने तरुणपणी केलेले चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळाली. आता या यादीमध्ये कोणते चित्रपट येतात चला पाहूया…
संजय दत्त मुख्य भूमिकेत असणारा रॉकी हा चित्रपट १९८१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून संजय दत्तने पदार्पण केले होते. या चित्रपटात संजय दत्तसोबत टीना अंबानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. त्यावेळी हा चित्रपट हिट ठरला होता.
सडक चित्रपटात संजय दत्तने पूजा भट्टसोबत स्क्रीन शेअर केली होती. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती.
खलनायक हा चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट संजय दत्तच्या करिअरमधील उत्कृष्ट आणि हिट चित्रपट समजला जातो. या चित्रपटात संजयसोबत माधुरी दीक्षित महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटाने संजय दत्तच्या करिअरला एक वेगळे वळण दिले. या चित्रपटात संजय दत्तचे वडील सुनील दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
इंद्र कुमार दिग्दर्शित धमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात रितेश देशमुख, अरशद वारसी, आशीष चौधरी आणि जावेद जाफरी हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
अग्निपथ या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या चित्रपटाने सर्वांच्या मनावर राज्य केले होते.