(1 / 5)सॅमसंग गॅलेक्सी एम ३४ स्मार्टफोनमध्ये १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.५ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सल प्रायमरी, ८ मेगापिक्सल सेकंडरी आणि २ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. यात ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी देखील देण्यात आली आहे. ऑक्टा-कोरमध्ये सॅमसंग एक्सीनॉस १२८० प्रोसेसर आहे, याची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे.