समंथा पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करत आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उजळून निघाली आहे. गेल्या काही काळापासून मायोसिटिसमुळे तिने आपले पूर्वीचे सौंदर्य काहीसे गमावले होते. मात्र, आता ती पुन्हा एकदा स्वतःची खूप काळजी घेत आहे.
वर्ल्ड पिकल बॉल लीगमधील चेन्नई सुपर चॅम्प्स संघाची मालक सामंथा हिने मंगळवारी (२१ जानेवारी) ही जर्सी लाँच केली. या कार्यक्रमासाठी सामंथा पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये आली होती.
या जर्सी लाँच इव्हेंटमध्ये तिला पाहिलेल्या चाहत्यांनी सामंथा चमकत असल्याचा दावा करत हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.