समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या ‘कुशी’ या चित्रपटाच्या यशामुळे प्रचंड आनंदात आहे. दुसरीकडे अभिनेत्री सध्या व्हेकेशन मोडवर असून, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहे. नुकतीच तिने दुबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिच्या लुक्वर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
(Instagram/@samantharuthprabhu)या कार्यक्रमात सहभागी झालेल्या समंथा रुथ प्रभूने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या आकर्षक गुलाबी रंगाच्या साडीत समंथा खूपच सुंदर दिसत होती.
(Instagram/@samantharuthprabhu)समंथा प्रभूच्या या लूकमध्ये अनेक डिटेल्सचा समावेश आहे. तिच्या या साडीसोबत ब्रालेट स्टाईल ब्लाउज आणि साडीशी मॅचिंग केप देखील परिधान केली आहे.
(Instagram/@samantharuthprabhu)‘इकाया’ या ब्रँडने डिझाईन केलेल्या समंथा रुथ प्रभूच्या या साडीची किंमत १४,९७५ रुपये इतकी आहे. या साडीची ही माहिती ‘इकाया’ या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
(Instagram/@samantharuthprabhu)