बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे चाहते त्याला प्रेमाने 'दबंग खान' किंवा 'भाईजान' म्हणतात. सलमान खानची ही प्रतिमा त्याच्या चित्रपटांमुळेही निर्माण झाली आहे. सलमान मुख्यतः ॲक्शन चित्रपट निवडतो. त्याने काही इमोशनल चित्रपट देखील केले आहेत, ज्यांचे IMDb रेटिंग खूप उच्च होते. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांची यादी.
२०१५ साली रिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान'ने बॉलिवूडचा 'भाईजान' एक वेगळ्याच शैलीत सादर केला होता, जो पुन्हा कोणी करू शकला नाही. एका ब्राह्मण मुलाची ही कथा होती जो एका मुस्लिम मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी पाकिस्तानला जातो. हा भावनिक चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला.
इमोशनल ड्रामा आणि फॅमिली ड्रामा यांचा मिलाफ पाहायचा असेल, तर १९९४ साली प्रदर्शित झालेला 'हम आपके है कौन' नक्की पाहावा. सलमान खानच्या काही सर्वात गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याची गणना केली जाते.
२००३मध्ये रिलीज झालेला 'बागबान' चित्रपट पाहूनही तुमच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत, तर तुम्ही माणूस नाही. हा सलमान खानच्या सर्वात भावनिक चित्रपटांपैकी एक आहे, ज्यात एका वृद्ध आईवडिलांची कथा दाखवण्यात आली आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'खामोशी' चित्रपटात सलमान खान आणि नाना पाटेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. १९९६मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने करोडो लोकांना भावूक केले होते.
सलमान खान आणि भाग्यश्रीच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर जे धमाके केले, ते सगळ्यांनीच बघायलाच हवेत. १९८९ मध्ये रिलीज झालेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळाले होते.
२००३ मध्ये रिलीज झालेला 'तेरे नाम' हा चित्रपट एका विक्षिप्त प्रियकराची कथा होती जो आपल्या प्रेमाच्या नादात अनेक वेडे प्रकार करतो. एका पुरोहिताच्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर त्याला काय काय करावे लागते हे चित्रपटात दाखवले आहे.