Ganpati Festival: दरवर्षी बाप्पाचे स्वागत करणारे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत. त्यांच्या घरी बाप्पाचे स्वागात मोठ्या जल्लोषात केले जाते.
(1 / 8)
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत करत आहेत. बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत ज्यांच्या घरी देखील बाप्पाचे मोठ्या थाटात आगमन होते. दरवर्षी मोठ्या जल्लोषात ते बाप्पाचे स्वागत करतात. आते हे कलाकार कोणते चला पाहूया…(instagram)
(2 / 8)
सलमान खान आणि त्याची बहीण अर्पिता दरवर्षी गणपती बाप्पाला घरी आणतात. दोघेही त्याचे मोठ्या थाटामाटात स्वागत करतात. या काळात सर्व कुटुंब आणि मित्रमंडळीही एकत्र असतात.(instagram)
(3 / 8)
दरवर्षी बाप्पाला घरी आणणाऱ्या सेलिब्रिटींपैकी शिल्पा शेट्टी देखील एक आहे. केवळ शिल्पाच नाही तर पती राज कुंद्रा आणि दोन्ही मुलेही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात.(instagram)
(4 / 8)
शाहरुख खानही दरवर्षी गणपती आणतो. किंग खानच्या कुटुंबाची खास गोष्ट म्हणजे ते प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात, मग तो गणेश चतुर्थी असो, दिवाळी असो किंवा ईद.(instagram)
(5 / 8)
श्रद्धा कपूरही दरवर्षी बाप्पाला घरी आणते. ती अगदी पारंपारिक पद्धतीने त्याचे स्वागत करते.(instagram)
(6 / 8)
सारा अली खानही दरवर्षी गणपती बाप्पाचे स्वागत तिची आई अमृतासोबत करते. सारा प्रत्येक हिंदू सण मनापासून साजरा करते.(instagram)
(7 / 8)
अनन्या पांडेही दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी करते. ती नेहमीच सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.(instagram)
(8 / 8)
सोनू सूद दरवर्षी गणपतीचे स्वागत करतो. तो आपल्या मित्रपरिवारालाही दर्शनासाठी बोलावतो.(instagram)