(2 / 6)मुरुगदास यांचा चित्रपट 'गजनी' हा याच नावाच्या २००५ साली आलेल्या साऊथ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनही मुरुगदास यांनी केले होते. त्यांना त्याची हिंदी आवृत्तीही तयार करायची होती, म्हणून ते बॉलिवूडकडे वळले. या चित्रपटात सलमान खानने काम करावे, अशी मुरुगदास यांची इच्छा होती. पण, चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्या प्रदीप रावत यांच्या सल्ल्याने त्यांचा विचार बदलला. चित्रपटासंदर्भात एका मुलाखतीदरम्यान, प्रदीप रावत यांनी स्वत: सांगितले होते की, मुरुगदास सलमान खानला कास्ट करण्यासाठी खूप उत्सुक होते.