सलमान खानसोबत इंडस्ट्रीतील अनेक हिरोइन्सनी पदार्पण केले आहे. यातील काही हिरोइन्स आज मोठी नावं बनली आहेत, तर काही हिरोइन्सनी बॉलिवूड इंडस्ट्रीला अलविदा केला आहे. त्या नायिकांची यादी येथे पहा.
आयशा झुल्का हे ९० च्या दशकात मोठे नाव होते. १९९१मध्ये तिने पहिला बॉलिवूड चित्रपट केला. या चित्रपटाचे नाव होते ‘कुर्बान’. या चित्रपटात आयशासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. आयशा अजूनही इंडस्ट्रीचा एक भाग आहे. तिने २०२२ मध्ये 'हुश हुश' मधून ओटीटी पदार्पण केले. २०२३मध्ये, आयशा ‘हॅप्पी फॅमिली: कंडीशन्स अप्लाय’ या मालिकेत दिसली होती. ही मालिका तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या करिअरची सुरुवात सलमान खानसोबत ‘मैंने प्यार किया’ (१९८९) या चित्रपटातून केली होती. या चित्रपटानंतर भाग्यश्रीने बिझनेसमन हिमालय दसानीशी लग्न केले. लग्नानंतर भाग्यश्रीने स्वत:ला फिल्मी जगापासून दूर केले. मात्र, बऱ्याच वर्षांनी भाग्यश्री पडद्यावर परतली. ‘स्मार्ट जोडी’ या रिॲलिटी शोमध्ये ती पतीसोबत दिसली होती. याशिवाय भाग्यश्री ‘राधे श्याम’मध्ये दिसली होती. भाग्यश्री अजूनही इंडस्ट्रीचा एक भाग आहे. तिचा हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
अभिनेत्री डेजी शाहने २०१४साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. डेझी शाह अजूनही चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. डेझी शाह ‘रेस ३’, ‘हेट स्टोरी ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २०१०मध्ये सलमान खानसोबत 'दबंग' चित्रपटातून पदार्पण केले होते. सोनाक्षीने तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. सोनाक्षी सिन्हा आज इंडस्ट्रीत मोठे नाव आहे. सोनाक्षी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. सोनाक्षी लवकरच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
भूमिका चावलाने २००३मध्ये ‘तेरे नाम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होता. या चित्रपटात सलमान खान आणि भूमिका मुख्य भूमिकेत दिसले होते. भूमिका अनेक दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांचा भाग नाही. मात्र, तरीही ती तामिळ चित्रपटांमध्ये काम करत आहे.