अंबानी कुटुंबीयांच्या घरी शनिवारी गणेश चतुर्थी सेलिब्रेशन होते. त्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स पोहोचले होते. त्यांनी बाप्पाचा आशिर्वाद घेतला.
(1 / 8)
अंबानी कुटुंबाने शनिवारी त्यांच्या घरी गणेश चतुर्थीची पूजा आयोजित केली होती. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या पूजेचे आमंत्रण देण्यात आले होते. काही कलाकारांनी हजेरी देखील लावली. कलाकारांच्या पारंपरिक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.(instagram)
(2 / 8)
सोनम कपूर पती आनंद आहुजा आणि मेहुणा करण बुलानीसोबत अंबानींच्या घरी पोहोचली होती. या सोहळ्याला सोनमने लाल रंगाचा अनारकली सूट घातला आहे(instagram)
(3 / 8)
या सेलिब्रेशनला सलमान खान भाची अलिजा अग्निहोत्रीसोबत पोहोचला होता. यावेळी सलमानने ब्राउन शर्ट आणि व्हाईट पॅन्ट घातली होती. अलिझाने पीच रंगाची साडी नेसली होती.(instagram)
(4 / 8)
करीना कपूर खान आणि सैफ अली खान देखील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी दोघेही लाल रंगाचे पोशाख परिधान केलेले दिसले.(instagram)
(5 / 8)
बी प्राक सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म करण्यासाठी पोहोचला होता. अनंत अंबानींसोबतचा एक फोटो त्याने शेअर केला आहे.(instagram)
(6 / 8)
अर्जुन कपूर(instagram)
(7 / 8)
सारा अली खान तिचा भाऊ इब्राहिमसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी साराने कलरफुल आउटफिट परिधान केला होता. तर इब्राहिमने जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.(instagram)
(8 / 8)
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बाप्पाच्या दर्शनासाठी अंबानींच्या घरी पोहोचले होते. कियाराने व्हाइट आणि गोल्डन कलरचा सूट घातला होता. तर सिद्धार्थने पीच कलरचा कुर्ता घातला होता.(instagram)