(2 / 8)मुंबईतील सलमान खानच्या घरासमोर पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी ४ राऊंड गोळीबार केला. या घटनेनंतर मुंबई पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक तपासानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावरील हल्ल्याची योजना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील लोकांनी आखली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोघे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत.