बॉलिवू़डमधील कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामध्ये सलमान खान, अक्षय कुमार, आयुषमान खुराना आणि इतर बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे. पण या कलाकारांकडे अभिनयाशिवाय लपलेले देखील कौशल्या आहे. ते कोणते चला जाणून घेऊया..
अभिनेता अक्षय कुमारने अभिनय आणि स्टंटच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच अक्षय कुमार उत्तम जेवण बनवताना दिसतो. त्याने बनवेले जेवण चाखण्यासाठी सर्वजण आतुर असतात.
अभिनेता सलमान खान हे अभिनयासोबतच उत्तम चित्रकार आहे. तो अनेकदा मिळालेल्या फावल्या वेळात चित्र काढताना दिसतो.
अभिनेत्री यामी गौतमने सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती एक उत्तम इंटिरियर डिझायनर आहे. तिने स्वत:च्या घरातील सगळे इंटिरिअर डिझाइन केले आहे.
अभिनेता आयुषमान खुराना अभिनयासोबतच उत्तम गायक देखील आहे. त्याचे काही अल्बम देखील प्रदर्शित झाले आहेत.