'औरों में कहां दम था' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. त्यावेळी चित्रपटातील कलाकार अजय देवगण, तब्बू, शंतनू माहेश्वरी, सई मांजरेकर आणि जिमी शेरगिल उपस्थित होते.
(AFP)अभिनेत्री तब्बू आणि अजय देवगण यांनी ट्रेलर लाँचच्या वेळी लेखक आणि दिग्दर्शक नीरज पांडेसोबतचे अनेक किस्से सांगितले.
(AFP)अभिनेता शंतनू माहेश्वरी या चित्रपटात पहिल्यांदाच सई मांजरेकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
(PTI)अजय देवगण आणि जिमी शेरगिल या दोन्ही कलाकारांनी ट्रेलर लाँचसाठी कॅज्युअल कपडे परिधान केले होते.
(AFP)अजय देवगण आणि तब्बू यांनी विजयपथ, हकीकत, तक्षक, फितूर, दृश्यम, गोलमाल अगेन, दे दे प्यार दे, दृश्यम 2 आणि भोला यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. आता ते पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
(PTI)ट्रेलरमध्ये अभिनेता जिमी शेरगिल 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटात तब्बूच्या पतीच्या भूमिकेत दिसत आहे.
(AFP)