दिग्दर्शक नागराज मंजुळे हे इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा काही तरी वेगळा असल्याचे पाहायला मिळते. आता लवकरच ते अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत चित्रपट करणार आहेत. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.
नागराज मंजुळे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या 'मटका किंग' या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात आता सई ताम्हणकरची एण्ट्री झाली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.
सईसोबत 'मटका किंग' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
"मटका किंग" चित्रपटाबद्दलची घोषणा सगळ्याच प्रेक्षकांसाठी उत्साही बातमी तर आहेच पण सई यात काय भूमिका साकारणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. सई आणि नागराज मंजुळे यांचा हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे आणि म्हणून यातून काय सिनेमॅटिक अनुभव अनुभवायला मिळणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
सईच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'मटका किंग' चित्रपटाव्यतिरिक्त तिचा "डब्बा कार्टेल" हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.