मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sachin Tendulkar: कोल्हापुरी चप्पल अन् फेटा! मास्टर ब्लास्टरचा मराठमोळा अंदाज

Sachin Tendulkar: कोल्हापुरी चप्पल अन् फेटा! मास्टर ब्लास्टरचा मराठमोळा अंदाज

12 August 2022, 19:52 IST Rohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
12 August 2022, 19:52 IST

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका विवाह सोहळ्यासाठी पुण्यात आला होता. हा विवाह सोहळा सचिनच्या मोठ्या भावाच्या मुलीचा होता. यावेळी सचिन तेंडुलकरने आपल्या परिवारासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच, लग्नातील सचिनच्या मराठमोळ्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सचिन तेंडुलकरच्या मोठ्या भावाच्या मुलीचे लग्न पुण्यात पार पडले. यावेळी सचिन देखील उपस्थित होता. या लग्नातील त्याचा मराठमोळा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(1 / 5)

सचिन तेंडुलकरने फेसबुकवर आपल्या पुतणीच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना त्याने 'पुतणीच्या  लग्नाला उपस्थित राहून कुंटुंबासोबत चांगले क्षण घालवले.' असे कॅप्शन दिले आहे.

(2 / 5)

सचिनने या लग्नावेळी मराठमोळा फेटा देखील बांधला होता. हा फेटा बांधतानाचा व्हिडिओ सचिनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

(3 / 5)

हा फोटो लग्नातीलच आहे. पण सचिनने हा फोटो रक्षाबंधनाच्या दिवशी पोस्ट केला होता. त्याने या फोटच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मला माझ्या आयुष्यातील पहिली बॅट देण्यापासून ते नेहमी माझ्या पाठीशी उभी राहण्यापर्यंत, माझी बहीण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे”. 

(4 / 5)

sachin tendulkar

(5 / 5)

sachin tendulkar(all photo- sachin tendulkar instagram)

इतर गॅलरीज