भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने गुरुवारी (६ फेब्रुवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. दोघांची भेट राष्ट्रपती भवनात झाली. यावेळी सचिन तेंडुलकर याचे कुटुंबीयही त्याच्यासोबत होते.
सचिन आणि आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोंध्ये सारा तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, सचिन आणि द्रौपदी मुर्मू दिसत आहेत.
या भेटीत सचिन तेंडुलकरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपली टेस्ट संघाची जर्सी भेट दिली. यानंतर सचिन आणि कुटुंबियांनी राष्ट्रपती यांच्यासोबत फोटो काढले. हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द- सचिन तेंडुलकर याने आपल्या करिअरमध्ये २०० कसोटी सामने खेळले आहेत.
सोबतच सचिन तेंडुलकरने ४६३ एकदिवसीय आणि एक टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
कसोटी फॉरमॅटमध्ये सचिन तेंडुलकरने ५३.७९ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. सध्या या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. मास्टर ब्लास्टरने १२ वर्षांपूर्वी कसोटी फॉरमॅटला अलविदा केला. पण कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकांचा विक्रम आजही त्याच्या नावावर कायम आहे.