(1 / 5)सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह काश्मीरला गेला आहे. तिथले विविध फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. सचिनने काश्मिरमध्ये एका बॅट फॅक्टरीलाही भेट दिली होती. काही दिवसांपूर्वी सचिन स्थानिक लोकांसोबत क्रिकेट खेळतानाही दिसला होता. यानंतर आता सचिनने पुन्हा एकदा आपल्या एक्स हँडलवर काश्मीर दौऱ्यातील काही फोटो पोस्ट केले आहेत.