मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sachin Tendulkar Birthday: शाहरुख खान ते अमिताभ बच्चन; ‘या’ बॉलिवूड कलाकारांचा लाडका आहे सचिन तेंडुलकर!

Sachin Tendulkar Birthday: शाहरुख खान ते अमिताभ बच्चन; ‘या’ बॉलिवूड कलाकारांचा लाडका आहे सचिन तेंडुलकर!

Apr 24, 2024 02:57 PM IST Harshada Bhirvandekar

Sachin Tendulkar Birthday Special: बॉलिवूडचे दिग्गज कलाकर देखील सचिन तेंडुलकरचे चाहते आहेत. सेलिब्रिटीसुद्धा क्रिकेटच्या देवाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाचा जर एखादा आवडता आणि लाडका खेळाडू कुणी असेल, तर तो सचिन तेंडुलकर आहे. निखळ प्रतिभा आणि दमदार खेळाने, या दिग्गज खेळाडूने क्रिकेटच्या जगातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयातही हक्काची जागा मिळवली आहे. सेलिब्रिटीसुद्धा क्रिकेटच्या देवाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. बॉलिवूडचे दिग्गज कलाकर देखील सचिन तेंडुलकरचे चाहते आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. पण तो स्वत: सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता आहे. त्याच्या २०१६च्या ‘फॅन’ चित्रपटाचे प्रमोशन करताना, अभिनेत्याने त्याचे ‘जबरा फॅन’ हे गाणे एका खास पोस्टद्वारे क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला समर्पित केले होते. यावेळी शाहरुखने लिहिले होती की, पंच काहीही म्हणत असले तरी, सचिन त्याच्यासाठी नेहमीच 'नॉट आऊट' राहणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

आयपीएल क्रिकेट संघ पंजाब किंग्जची सह-मालकिण असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिला खेळाची आवड आहे. पण, ती क्रिकेट प्रेमी कशी बनली माहितीये का? याचं करणा आहे सचिन तेंडुलकर. सचिनच्या निवृत्तीनंतर, प्रीतीने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने सचिनमुळे आपले क्रिकेटशी संबंध कसे जुळले, आणि ती कशी क्रिकेटप्रेमी बनली, हे सांगताना आपली कृतज्ञता व्यक्त केली होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

आमिर खान आणि सचिन तेंडुलकर हे खूप जवळचे मित्र आहेत. आमिरने एकदा खुलासा केला होता की, क्रिकेटर सचिन तेंडुलकर रिलीजपूर्वीच आमिरचे सगळे चित्रपट पाहतो. ‘लगान’च्या स्क्रिनिंगदरम्यान, आमिरने एका फॅनबॉयप्रमाणे या क्षणांचा आनंद लुटला होता. आमिरने स्वतः सचिनला चित्रपटातील त्याच्या क्रिकेट सीन्सवर चिअर करताना पाहिले होते. बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने एका मुलाखतीत संधी मिळाल्यास ऑनस्क्रीन सचिनची भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

तेलगू सुपरस्टार महेश बाबूचे क्रिकेटवरील प्रेम सर्वांनाच माहीत आहे. २०२०मध्ये त्याने चाहत्यांसाठी आयोजित केलेल्या सोशल मीडियावरील ‘आस्क मी’ सेशनमध्ये महेशने जाहीर केले होते की, विराट कोहली आणि एमएस धोनी हे त्याचे आवडते क्रिकेटर आहेत. मात्र, सचिन आपला 'ऑल टाईम फेव्हरेट' असल्याचे त्याने स्पष्ट केले. एका मुलाखतीदरम्यानही जेव्हा त्याला विचारले गेले की, त्याचा सगळ्यात आवडता क्रिकेटर कोण? तेव्हा त्याने सचिन तेंडुलकर याचे नाव घेतले होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नेहमीच सचिनला आयडॉल आणि आपल्या देशाची शान म्हटले आहे. एकेकाळी जेव्हा सचिन तेंडुलकरची तुलना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनशी केली जात होती, तेव्हा बिग बींनी पुढाकार घेत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नेहमीच सचिनला आयडॉल आणि आपल्या देशाची शान म्हटले आहे. एकेकाळी जेव्हा सचिन तेंडुलकरची तुलना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनशी केली जात होती, तेव्हा बिग बींनी पुढाकार घेत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज