मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sachin-Anjali Love Story : ५ वर्ष डेटिंग, मग विवाह… अशी आहे सचिन-अंजलीची सुंदर लव्हस्टोरी

Sachin-Anjali Love Story : ५ वर्ष डेटिंग, मग विवाह… अशी आहे सचिन-अंजलीची सुंदर लव्हस्टोरी

Apr 24, 2024 12:33 PM IST Rohit Bibhishan Jetnavare

  • Sachin Tendulkar 51st Birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (२४ एप्रिल) आपला ५१वा वाढदिवस (Sachin Tendulkar Birthday) साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त आपण सचिन आणि अंजली यांच्या लव्हस्टोरीबाबत जाणून घेणार आहोत. दोघांनी जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केले.

sachin and anjali beautiful love story : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (२४ एप्रिल) आपला ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या सचिनने तीन दशकांहून अधिक काळ या खेळावर राज्य केले. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

यामुळेच चाहते सचिनला क्रिकेटचा देवही म्हणतात. सचिनने क्रिकेटच्या मैदानावर असंख्य विक्रम केले आहेत. सचिनने क्रिकेटच्या खेळपट्टीवर ज्या प्रकारे यश मिळवले, त्याचप्रमाणे त्याने लव्ह लाईफमध्ये यश मिळवले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

सचिनची लाइफ पार्टनर अंजली सचिनपेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे पण तरीही त्याचा त्यांच्या नात्यावर काहीच परिणाम झाला नाही. सचिन आणि अंजली पहिल्यांदाच विमानतळावर एकमेकांना भेटले होते. दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले.  पहिल्या भेटीत दोघांमध्ये काहीही बोलणे झाले नाही. पण दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने तिला सचिनबद्दल सांगितले की तो क्रिकेटर आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

सचिन-अंजलीची पहिली भेट - सचिन जेव्हा विमानतळावर अंजलीला भेटला तेव्हा तो इंग्लंड दौऱ्यावरून परतत होता तर अंजली तिच्या आईला घेण्यासाठी तिथे पोहोचली होती. या पहिल्या भेटीनंतर दोघे एका पार्टीत भेटले. येथे सचिन आणि अंजलीने पहिल्यांदा संवाद साधला.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

अंजली ही मेडीकल स्टुडंट होती. ती तिच्या अभ्यासात खूप मग्न असायची. त्यामुळेच तिला क्रिकेटची फारशी माहिती नव्हती. मात्र, सचिनला भेटल्यानंतर अंजलीने क्रिकेटमध्ये ऋची घ्यायला सुरुवात केली. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

सचिन-अंजली यांच्यात जसजसा संवाद वाढला तसतशी दोघांच्या भेटीगाठीही वाढू लागल्या. यानंतर दोघांनी एकमेकांना ५ वर्षे डेट केले, पण सचिन त्याच्या क्रिकेट शेड्युलमध्ये व्यस्त होता आणि अंजलीही तिच्या वैद्यकीय करिअरमध्ये व्यस्त होती, त्यामुळे ते दोघे फारसे सोबत फिरू शकले नाहीत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

अंजलीला पत्रकार बनवून घरच्यांना भेटवले- यानंतर आता घरच्यांना भेटण्याची वेळी आली होती. सचिन अंजलीला तिच्या घरी घेऊन जायला खूप कचरत होता. आपल्या प्रेमाबद्दल कुणाला कळू नये असे त्याला वाटत होते, पण घरच्या लोकांना तर भेटावे लागणारच होते. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

मग सचिनच्या डोक्यात एक प्लॅन आला, त्याने एक योजना आखली आणि त्याने घरच्यांना खोटे सांगून अंजलीची ओळख करून दिली. खरे तर एका मुलाखतीत अंजलीने सांगितले होते की, सचिनने तिला पत्रकार म्हणून घरातील लोकांना भेटायला सांगितले होते. सचिनने सांगितलेल्या प्लॅननुसार ती सलवार कमीज घालून त्याच्या घरी गेली होती.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

अशा प्रकारे दीर्घकाळ डेट केल्यानंतर सचिन आणि अंजलीची जवळीक हळूहळू एंगेजमेंट आणि नंतर लग्नापर्यंत पोहोचली. २४ मे १९९५ रोजी सचिनने अंजलीसोबत लग्न केले. दोन वर्षांनंतर १२ ऑक्टोबर १९९७ रोजी त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला, तिचे नाव सारा आहे. अर्जुनचा जन्म तेथे २४ सप्टेंबर १९९९ रोजी झाला.
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती सुमारे १५० मिलियन डॉलर्स दशलक्ष असल्याचा अंदाज आहे. त्याचे कुटुंब वांद्रे येथील एका आलिशान घरात राहते.
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती सुमारे १५० मिलियन डॉलर्स दशलक्ष असल्याचा अंदाज आहे. त्याचे कुटुंब वांद्रे येथील एका आलिशान घरात राहते.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज