रशियाची राजधानी मॉस्कोमधील कॉन्सर्ट हॉलमधील गोळीबारातील मृतांचे मृतदेह वाहून नेणारे कर्मचारी.
(AP)या हल्ल्यात १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
(REUTERS)मॉस्कोतील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी घुसून तेथे उपस्थित असलेल्यांवर अंदाधुंद गोळीबार केला.
(AP)रशियन माध्यमांनी आणि टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वारंवार गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. एका व्हिडिओत रायफल घेऊन दोन जण कॉन्सर्ट हॉलमध्ये फिरताना दिसत आहेत.
(REUTERS)रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॉस्कोचे विमानतळ, रेल्वे स्थानके आणि राजधानीतील भुयारी मार्गावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.
(AP)