रशियन सैन्याने गेल्या २४ तासांत १४० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले, ज्यामुळे युक्रेनचा काही भाग उद्ध्वस्त झाला आहे. यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या २४ तासांत मोठा हल्ला करत रशियाने युक्रेनचे कालिनोव गाव ताब्यात घेतले. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात रशियाने युक्रेनचा मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे. तर युक्रेनच्या फौजा देखील रशियात घुसल्या आहेत. युक्रेनने रशियाकडून लढणाऱ्या उत्तर कोरियाच्या दोन सैनिकांना ताब्यात घेतले असल्याचा दावा केला असून त्यांचा व्हिडिओ देखील जारी केला आहे.
२३,००० घरांची वीज गेली : स्थानिक लष्करी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दक्षिण युक्रेनच्या खेरसन प्रदेशात रशियन गोळीबारामुळे विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले, ज्यामुळे सुमारे २३,००० घरांची वीज गेली.
भयंकर हल्ला : रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, रशियन सैन्याने २४ तासांत युक्रेनियन लष्करी लक्ष्यांवर १३९ क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि तोफखान्यांचे हल्ले केले.
अनेक इमारतींचे नुकसान : रशियन सैन्याने या प्रदेशातील वस्त्यांमधील सामाजिक पायाभूत सुविधा आणि निवासी क्षेत्रांवर भीषण हल्ले केले. विशेषतः २ बहुमजली इमारती आणि ८ खाजगी घरांचे नुकसान या हल्ल्यात झाले," असे खेरसनचे गव्हर्नर ओलेक्झांडर प्रोकुडिन यांनी टेलिग्रामवर सांगितले.
सैन्याची देवाणघेवाण : रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनियन युद्धकैद्यांच्या परतफेडीच्या बदल्यात, पकडलेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांना प्योंगयांगला सोपवण्यास युक्रेन तयार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले.
युक्रेन अटी : युक्रेनियनच्या अध्यक्षांनी सांगितले की युद्धात पकडले गेलेले उत्तर कोरियाचे सैनिक आम्ही त्यांना सोपण्यास तयार आहोत, मात्र, त्यांच्या बदल्यात रशियाने युक्रेनच्या युद्धकैद्यांना मुक्त करावे.
रशियावर कारवाई : युक्रेनला त्याचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि रशियाविरुद्ध लढण्यास मदत करण्यासाठी अमेरिकेने रशियावर मोठे निर्बंध लादले आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असून त्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या दहा दिवस आधी, बायडेन प्रशासनाने रशियाला ऊर्जा, विशेषतः गॅस निर्यात करण्यास मदत करणाऱ्या कंपन्या आणि संस्थांवर निर्बंध लादले. यापैकी दोन कंपन्या भारतातील आहेत., 'स्कायहार्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस' आणि 'एव्हिजन मॅनेजमेंट सर्व्हिसेस' या दोन भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.