Rupali Ganguly Husband First Wife : रुपाली गांगुली आणि तिचा पती सध्या सध्या खूप नकारात्मकतेचा सामना करत आहेत. रुपालीच्या सावत्र मुलीने तिच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.
(1 / 8)
रुपाली गांगुलीची सावत्र मुलगी ईशा वर्माने अभिनेत्रीवर अनेक आरोप केल्यापासून ती चर्चेत आली आहे. जेव्हापासून हा वाद सुरू झाला तेव्हापासून, रुपालीचा पती अश्विन आणि त्याची पूर्वपत्नी यांच्याबद्दल सर्वांना जाणून घ्यायचे आहे.(instagram)
(2 / 8)
रुपालीच्या आधी अश्विनने दोनदा लग्न केले आहे. अश्विनला दुसऱ्या लग्नापासून ईशा ही मुलगी आहे. ईशा तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असते आणि तिच्या प्रोफाईलवर तुम्हाला अश्विनच्या माजी पत्नीची झलक पाहायला मिळेल.
(3 / 8)
ईशाने अश्विन आणि तिच्या आईचे पूर्वीचे फोटोही शेअर केले आहेत. ती या दोघांचे रोमँटिक फोटो शेअर करत असते.
(4 / 8)
ईशाने त्यावेळचे काही फोटोही शेअर केले होते, ज्यात ती खूप लहान दिसत आहे आणि तिचे पालक तिच्यासोबत फोटो पोज देत आहेत.(instagram)
(5 / 8)
जर तुम्ही ईशाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर नजर टाकली, तर तुमच्या लक्षात येईल की, ती तिच्या आईच्या खूप जवळ आहे आणि तिचे वडिलांशीही खूप चांगले संबंध आहेत.(instagram)
(6 / 8)
ईशाच्या आईचेही इन्स्टाग्राम अकाउंट आहे, पण तिने ते खाजगी ठेवले आहे.(instagram)
(7 / 8)
ईशाने एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अश्विन आणि रुपाली एकत्र दिसत आहेत. तर त्यांच्यासोबत ईशा देखील आहे.(instagram)
(8 / 8)
ईशाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती भावूक झालेली दिसत आहे. त्यात ती म्हणाली की, तिला गेल्या २० वर्षांपासून खूप त्रास होत आहे आणि लवकरच आणखी काही गोष्टी स्पष्ट करणार आहेत.(instagram)