‘महाभारता’वर अनेक शो झाले आहेत. या कथेवर बनवलेला प्रत्येक शो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या शोमध्ये द्रौपदीच्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. द्रौपदी ही पांचालचा राजा द्रुपदाची मुलगी आणि पांडवांची पत्नी होती.
(instagram)पडद्यावर अनेक अभिनेत्रींनी ‘द्रौपदी’ची भूमिका साकारली आहे. द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींबद्दल आज जाणून घेऊया…
(instagram)१९८९मध्ये ‘महाभारत’ ही मालिका सुरू झाली, ज्यामध्ये रूपा गांगुलीने द्रौपदीची भूमिका केली होती. रुपाच्या कामाचे खूप कौतुक झाले. रूपा बऱ्याच दिवसांपासून चित्रपट आणि टीव्ही शोपासून दूर आहे. ती सध्या राजकारणात व्यस्त आहे.
(instagram)१९९३मध्ये रामानंद सागर यांच्या ‘श्रीकृष्ण’ या शोमध्ये फाल्गुनी पारेखने द्रौपदीची भूमिका साकारली होती. फाल्गुलीने काही चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. मात्र, सध्या ती चित्रपट आणि शोमध्ये फारशी सक्रिय नाही.
(instagram)१९९७मध्ये अश्विनी काळसेकर यांनी 'एक और महाभारत' या शोमध्ये द्रौपदीची भूमिका साकारली होती. आज अश्विनीने अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे. तिच्या कामाचे नेहमीच कौतुक होत असते.
(instagram)‘द्रौपदी’ ही मालिका २००१मध्ये आली होती. या शोमध्ये मृणाल कुलकर्णीने द्रौपदीची भूमिका साकारली होती. या शोनंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याशिवाय मृणाल कुलकर्णी ‘सोन परी’ या शोमध्ये देखील दिसली. या वर्षी रिलीज झालेल्या रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती.
(instagram)२००८मध्ये एकता कपूरचा 'कहानी हमारे महाभारत की' हा शो आला होता, ज्यामध्ये अनिता हसनंदानीने द्रौपदीची भूमिका साकारली होती. या शोमध्ये महाभारताची कथा इतर शोपेक्षा वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली होती. शोमध्ये अनिताच्या खांद्यावरचा टॅटू दिसत असल्याने प्रेक्षकांनी त्यावर खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या.
(instagram)