Tsunami alert in Indonesia after Ruang volcano erupts : इंडोनेशियात रुआंग ज्वालामुखीत मोठा उद्रेक झाला आहे. येथील ज्वालामुखी केंद्राच्या म्हणण्यानुसार, रुआंग पर्वताच्या ज्वालामुखीमध्ये गेल्या दोन दिवसांत पाच पेक्षा अधिक उद्रेक झाले आहेत. यामुळे आलेल्या भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा दिला आहे.
(1 / 5)
A volcano erupted several times in Indonesia's outermost region overnight on April 17, forcing hundreds of people to be evacuated after it spewed lava and a column of smoke more than a mile into the sky. (AFP)
(2 / 5)
इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी बुधवारी रुआंग माउंटनवर उद्रेक झाल्यानंतर त्सुनामीचा इशारा जारी केला. या नंतर या परिसररात राहणारया ११ हजारहून अधिक लोकांना परिसर रिकामा करण्याचा आदेश अधिकाऱ्यांनी दिला. (AFP)
(3 / 5)
अधिकाऱ्यांनी ज्वालामुखीचा मोठा धोका असल्याचे देखील म्हटले आहे. याची दखल घेत येथील बहुतांश नागरिकांनी त्यांची घरे सोडली आहेत(AFP)
(4 / 5)
इंडोनेशियाच्या नॅशनल डिझास्टर मिटिगेशन एजन्सीने सांगितले की रहिवाशांना सुलावेसी बेटावरील मॅनाडो या जवळच्या शहरामध्ये स्थलांतरित केले जाईल, हे अंतर बोटीने सहा तासांचे आहे. (AFP)
(5 / 5)
अधिकाऱ्यांना काळजी वाटते की ज्वालामुखीचा काही भाग समुद्रात कोसळू शकतो आणि तेथे १८७१ च्या उद्रेकाप्रमाणे त्सुनामी येण्याची शक्यता आहे. (AP)