लाल गुलाब
लाल रंग प्रेम आणि उत्कटतेचं प्रतीक आहे. लाल गुलाबाचा वापर सामान्यत: प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि वचन देण्यासाठी केला जातो.
(Pixabay)पांढरा गुलाब
पांढरा गुलाब निखळ प्रेम, आदर आणि सन्मानाचं प्रतीक आहे. हे गुलाब जास्तकरून सजावटीसाठी वापरले जातात किंवा आपणास जे प्रिय आहेत, त्यांना अर्थपूर्ण भेट म्हणून दिले जातात.
(Unsplash)पिवळा गुलाब
पिवळा गुलाब मैत्री, उबदारपणा, आनंद आणि सकारात्मकता दर्शवितो. कौतुक करण्यासाठी आणि एकमेकांसाठी ते किती महत्वाचे आहेत हे दर्शविण्यासाठी मित्र बऱ्याचदा पिवळ्या गुलाबांची देवाणघेवाण करतात.
(Unsplash)निळा गुलाब
निळा गुलाब हा संवेदनशीलता आणि भावनिक शक्तीचं प्रतीक आहे. हा गुलाब एखाद्याला भेट म्हणून देणं म्हणजे त्याच्याबद्दल भावनिक संबंध आणि समजूतदारपणा व्यक्त करणं असा त्याचा अर्थ होतो.
(Unsplash)आडू गुलाब
गुलाबाचा हा रंग सहानुभूती, नम्रता आणि प्रामाणिकपणा दर्शवितो. खऱ्या बांधिलकीचे संकेत म्हणून अनेकदा प्रेमीयुगुलांमध्ये या रंगाच्या गुलाबाची देवाणघेवाण केली जाते.
(Unsplash)गुलाबी गुलाब
हे स्त्रीत्व, लालित्य आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. एखाद्याच्या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून, आकर्षणाचं कौतुक व्यक्त करण्यासाठी हे गुलाब दिले जातात.
(Unsplash)