मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs SA Final : रोहितसमोर मार्को यान्सेन तर कुलदीप वि. क्लासेन… या ५ लढती ठरवतील वर्ल्ड चॅम्पियन!

IND vs SA Final : रोहितसमोर मार्को यान्सेन तर कुलदीप वि. क्लासेन… या ५ लढती ठरवतील वर्ल्ड चॅम्पियन!

Jun 29, 2024 04:34 PM IST
  • twitter
  • twitter
  • T20 World Cup 2024 Final : टी-20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघात तगड्या खेळाडूंची फौज आहेत. अशा स्थितीत या सामन्यात होणाऱ्या काही खास लढतींबाबत जाणून घेणार आहोत.
बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन शहरातील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 विश्वचषक विजेतेपदाची लढत होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. 
share
(1 / 7)

याचा अर्थ टी-20 वर्ल्डकप फायनल अतिशय रोमहर्षक होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघात जगातील अव्वल खेळाडूंचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला या सामन्यातील टॉप-५ खेळाडूंच्या लढतींबद्दल सांगणार आहोत. या लढतींमधूनच नवा वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेट जगताला मिळेल.
share
(2 / 7)

कागिसो रबाडा-विराट कोहली-  ७ सामन्यांत केवळ ७५ धावा करणाऱ्या विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने ८ सामन्यांत १२ विकेट घेतल्या आहेत. रबाडाच्या चेंडूंचा सामना करताना कोहलीला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. रबाडाने त्याला १२ डावात ४ वेळा बाद केले आहे.
share
(3 / 7)

रोहित शर्मा मार्को यान्सेन-  मोहम्मद आमिर आणि शाहीन शाह आफ्रिदी यांसारखे डावखुरे वेगवान गोलंदाज रोहित शर्माला त्रास देताना दिसले आहेत. अशा स्थितीत डावखुरा मार्को यान्सेन याचा फायदा घेऊ शकतो. आकडेवारी रोहितच्या बाजूने आहे, रोहितने T20 सामन्यांतील ९ डावांमध्ये यानसेनचा सामना केला आहे आणि केवळ एकदाच त्याच्या गोलंदाजीवर आऊट झाला आहे.
share
(4 / 7)

ऋषभ पंत-केशव महाराज- ऋषभ पंतने आतापर्यंत ७ सामन्यांत १७१ धावा केल्या आहेत. तर केशव महाराजने ९ विकेट्स घेतल्या आहेत. पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे आणि पहिल्या १० षटकांमध्ये महाराजचा सामना करू शकतो. 
share
(5 / 7)

क्विंटन डीकॉक- जसप्रीत बुमराह- क्विंटन डीकॉने या वर्ल्डकपमध्ये ८ सामन्यांत २०२४ धावा केल्या आहेत. आता त्याचा सामना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी होणार आहे, ज्याने आतापर्यंत १३ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याच्याविरुद्ध धावा करणे सोपे नाही.  डीकॉक आणि बुमराह यांच्यातील थरार पाहण्यासारखा असेल.
share
(6 / 7)

कुलदीप यादव-हेनरिक क्लासेन-  दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्लासेन फिरकीपटूंना खेळण्यात पटाईत आहे, पण या विश्वचषकात ८ सामन्यांत त्याला केवळ १३८ धावा करता आल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही फक्त ११२ आहे. अशा स्थितीत भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवशी त्याचा सामना रंजक असेल. 
share
(7 / 7)

इतर गॅलरीज