रोहित शेट्टी हा चित्रपटसृष्टीतील नवीन ॲक्शन आणि कॉमेडी दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने ‘गोलमाल’ आणि ‘सिंघम’सारखे क्लासिक कल्ट कॉमेडी चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. या चित्रपटांच्या कमाईतून दिग्दर्शकाने मुंबईत १० मजली घर बांधले आहे. जाणून घ्या या आलिशान घराविषयी…
मुंबईतील जुहू येथे असलेल्या रोहित शेट्टीच्या १० मजली इमारतीचे नाव ‘शेट्टी टॉवर’ आहे. फोर्ब्सनुसार या इमारतीची किंमत २८२ कोटींहून अधिक आहे. रोहित शेट्टी हा सर्वात श्रीमंत दिग्दर्शकांपैकी एक आहे.
रोहित शेट्टीला त्याचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर शेअर करणे आवडत नाही. त्यामुळे घराच्या आतील भागाचे काही मोजकेच फोटो सोशल मीडियावर आहेत. चित्रपटांमधून यश मिळताच दिग्दर्शकाने ही सी फेसिंग इमारत खरेदी केली होती.
या इमारतीच्या वरच्या दोन मजल्यावर रोहित शेट्टी आपल्या कुटुंबासह राहतो. त्यांच्या सगळ्या गाड्या खालच्या चार मजल्यांवर उभ्या आहेत. शिवाय या बिल्डींगमध्ये एक मोठी बाग आहे. एक सिक्युरिटी केबिन आहे. उर्वरित चार मजले त्याने भाड्याने दिले आहेत.
रोहित शेट्टीच्या या भव्य घरात फिटनेस उपकरणेही ठेवण्यात आली आहेत. दिग्दर्शकाचा मुलगा ईशान अनेकदा इथे व्यायाम करताना दिसतो. हे फोटो जुने आहेत. पण घरातील हे मोठे टायर पाहून अंदाज बांधता येतो की, वडिलांप्रमाणेच त्याच्या मुलालाही फिट राहायला आवडते.
रोहित शेट्टीचे घर जुहू येथे एका खास ठिकाणी आहे. त्यांच्या शेजारी शत्रुघ्न सिन्हा यांची ‘रामायण’ नावाची भव्य इमारत आहे. तर, दुसरीकडे अमिताभ बच्चन यांचे घर जलसा आहे. त्याच्या बिल्डिंगजवळ शक्ती कपूर, हेमा मालिनी, अजय देवगणही राहतात.
रोहित शेट्टीने आपल्या इमारतीतील अनेक खोल्या मुंबई पोलिसांना कोरोनाच्या काळात राहण्यासाठी दिल्या होत्या. कोरोनाच्या काळात त्याने अनेक हॉटेल्समध्ये पोलिसांची राहण्याची व्यवस्थाही केली होती. त्याच्या चाहत्यांना रोहितची हीच उदारता आवडते. सध्या दिग्दर्शक रोमानियामध्ये ‘खतरों के खिलाडी १४’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.