Team India Victory Parade : वानखेडेवर टीम इंडियाचा जल्लोष, कोहली-रोहितचं भावूक भाषण; विजयी परेडमध्ये काय घडलं? पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Team India Victory Parade : वानखेडेवर टीम इंडियाचा जल्लोष, कोहली-रोहितचं भावूक भाषण; विजयी परेडमध्ये काय घडलं? पाहा

Team India Victory Parade : वानखेडेवर टीम इंडियाचा जल्लोष, कोहली-रोहितचं भावूक भाषण; विजयी परेडमध्ये काय घडलं? पाहा

Team India Victory Parade : वानखेडेवर टीम इंडियाचा जल्लोष, कोहली-रोहितचं भावूक भाषण; विजयी परेडमध्ये काय घडलं? पाहा

Jul 05, 2024 10:14 AM IST
  • twitter
  • twitter
  • भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. यानंतर टीम इंडिया ५ दिवसांनी भारतात परतली. मुंबईत टीम इंडियाची विजयी मिरवणूक पार पडली. या मिरवणूकीला लाखो लोक जमले होते, मरीन ड्राइव्हवर पाय ठेवायला जागा नव्हती. या संस्मरणीय दिवसभरात टीम इंडियाने काय केले जाणून घेऊया.
टी-20 विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर (४ जुलै) मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच मायेदशी परतू शकली नाही.
twitterfacebook
share
(1 / 11)
टी-20 विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर (४ जुलै) मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच मायेदशी परतू शकली नाही.(PTI)
टी-२० वर्ल्डकप विजयाच्या ५ दिवसानंतर टीम भारतात परतली. यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी अगदी जल्लोषात आणि लाखोंच्या गर्दीने जमा होत स्वागत केले. आधी दिल्ली आणि नंतर मुंबई या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी होती. चाहत्यांनी कॅप्टन रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा दिल्या.
twitterfacebook
share
(2 / 11)
टी-२० वर्ल्डकप विजयाच्या ५ दिवसानंतर टीम भारतात परतली. यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी अगदी जल्लोषात आणि लाखोंच्या गर्दीने जमा होत स्वागत केले. आधी दिल्ली आणि नंतर मुंबई या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी होती. चाहत्यांनी कॅप्टन रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा दिल्या.(PTI)
टीम इंडियाचा रोड शो मुंबईत झाला. जिथे टीम इंडिया ओपन बसवर स्वार होऊन मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
twitterfacebook
share
(3 / 11)
टीम इंडियाचा रोड शो मुंबईत झाला. जिथे टीम इंडिया ओपन बसवर स्वार होऊन मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.(AFP)
टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया ओपन बसमधून मरीन ड्राइव्हला पोहोचला, जिथे जगज्जेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी लाखोंचा जमाव आधीच उपस्थित होता. नरिमन पॉइंटवरून सर्व भारतीय खेळाडूंनी खुल्या बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली.
twitterfacebook
share
(4 / 11)
टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया ओपन बसमधून मरीन ड्राइव्हला पोहोचला, जिथे जगज्जेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी लाखोंचा जमाव आधीच उपस्थित होता. नरिमन पॉइंटवरून सर्व भारतीय खेळाडूंनी खुल्या बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली.(PTI)
या दरम्यान, विराट कोहलीने भारताच्या ऐतिहासिक विजयाचे बरेच श्रेय जसप्रीत बुमराहला दिले. दुसरीकडे रोहित शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट संस्मरणीय असल्याचे सांगितले. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केल्यावर हा संपूर्ण कार्यक्रम संपला.
twitterfacebook
share
(5 / 11)
या दरम्यान, विराट कोहलीने भारताच्या ऐतिहासिक विजयाचे बरेच श्रेय जसप्रीत बुमराहला दिले. दुसरीकडे रोहित शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट संस्मरणीय असल्याचे सांगितले. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केल्यावर हा संपूर्ण कार्यक्रम संपला.(PTI)
रोहित शर्मा काय म्हणाला- ही ट्रॉफी आमची नसून सर्व देशवासियांची आहे. सकाळी पंतप्रधान मोदींना भेटून खूप छान वाटले. त्यांना खेळाबद्दल खूप उत्साह आहे. जेव्हा डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याला शॉट मारला तेव्हा मला वाटले होते की जोरदार वाऱ्यामुळे षटकार जाईल, पण हे सर्व नशिबात लिहिले आहे. शेवटी सूर्यकुमार यादवचा झेल अविश्वसनीय होता. मला या संपूर्ण टीमचा अभिमान आहे.
twitterfacebook
share
(6 / 11)
रोहित शर्मा काय म्हणाला- ही ट्रॉफी आमची नसून सर्व देशवासियांची आहे. सकाळी पंतप्रधान मोदींना भेटून खूप छान वाटले. त्यांना खेळाबद्दल खूप उत्साह आहे. जेव्हा डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याला शॉट मारला तेव्हा मला वाटले होते की जोरदार वाऱ्यामुळे षटकार जाईल, पण हे सर्व नशिबात लिहिले आहे. शेवटी सूर्यकुमार यादवचा झेल अविश्वसनीय होता. मला या संपूर्ण टीमचा अभिमान आहे.(PTI)
विराट कोहली काय म्हणाला- रोहित शर्मा आणि मी खूप दिवसांपासून ही कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होतो. आमचे स्वप्न नेहमीच विश्वचषक जिंकण्याचे होते. गेली १५ वर्षे आम्ही एकत्र खेळत आहोत आणि कदाचित रोहितला इतका भावूक होताना मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. तो रडत होता, मीही रडत होतो, आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज दररोज जन्माला येत नाही आणि तो जगातील आठवे आश्चर्य आहे.
twitterfacebook
share
(7 / 11)
विराट कोहली काय म्हणाला- रोहित शर्मा आणि मी खूप दिवसांपासून ही कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होतो. आमचे स्वप्न नेहमीच विश्वचषक जिंकण्याचे होते. गेली १५ वर्षे आम्ही एकत्र खेळत आहोत आणि कदाचित रोहितला इतका भावूक होताना मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. तो रडत होता, मीही रडत होतो, आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज दररोज जन्माला येत नाही आणि तो जगातील आठवे आश्चर्य आहे.(AFP)
राहुल द्रविड काय म्हणाला- लोकांच्या या प्रेमाची मला खूप आठवण येईल. आज मी रस्त्यावर पाहिलेले दृश्य कधीही विसरणार नाही.
twitterfacebook
share
(8 / 11)
राहुल द्रविड काय म्हणाला- लोकांच्या या प्रेमाची मला खूप आठवण येईल. आज मी रस्त्यावर पाहिलेले दृश्य कधीही विसरणार नाही.(PTI)
जसप्रीत बुमराह काय म्हणाला- आज मी जे काही पाहिलं, मी याआधी असं काही पाहिलं नव्हतं. मला सध्या निवृत्ती घेण्याची इच्छा नाही. माझी निवृत्ती अजून दूर आहे, ही फक्त सुरुवात आहे.
twitterfacebook
share
(9 / 11)
जसप्रीत बुमराह काय म्हणाला- आज मी जे काही पाहिलं, मी याआधी असं काही पाहिलं नव्हतं. मला सध्या निवृत्ती घेण्याची इच्छा नाही. माझी निवृत्ती अजून दूर आहे, ही फक्त सुरुवात आहे.(REUTERS)
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चक दे ​​इंडियाच्या तालावर नाचून आनंद साजरा केला. मरीन ड्राइव्ह येथे ओपन-टॉप बसमध्ये विजय परेडनंतर भारतीय संघ रात्री ९ वाजता वानखेडे स्टेडियमवर पोहोचला. वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर रोहितने विराट कोहलीला आपल्यासोबत प्रेक्षक स्टँडकडे खेचले आणि दोघांनीही भांगडा केला. 
twitterfacebook
share
(10 / 11)
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चक दे ​​इंडियाच्या तालावर नाचून आनंद साजरा केला. मरीन ड्राइव्ह येथे ओपन-टॉप बसमध्ये विजय परेडनंतर भारतीय संघ रात्री ९ वाजता वानखेडे स्टेडियमवर पोहोचला. वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर रोहितने विराट कोहलीला आपल्यासोबत प्रेक्षक स्टँडकडे खेचले आणि दोघांनीही भांगडा केला. (PTI)
'बेरील' नावाच्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया अनेक दिवस बार्बाडोसमध्ये अडकली होती. अशा परिस्थितीत भारतीय संघ आणि संपूर्ण स्टाफासाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली होती. १६ तासांच्या प्रवासानंतर भारतीय संघ अखेर गुरुवारी सकाळी दिल्लीच्या IGI विमानतळावर उतरला. त्यानंतर संघाची मौर्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्यानंतर सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत नाश्ता केला. पंतप्रधान मोदींसोबत सर्व खेळाडूंचे फोटोशूटही झाले
twitterfacebook
share
(11 / 11)
'बेरील' नावाच्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया अनेक दिवस बार्बाडोसमध्ये अडकली होती. अशा परिस्थितीत भारतीय संघ आणि संपूर्ण स्टाफासाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली होती. १६ तासांच्या प्रवासानंतर भारतीय संघ अखेर गुरुवारी सकाळी दिल्लीच्या IGI विमानतळावर उतरला. त्यानंतर संघाची मौर्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्यानंतर सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत नाश्ता केला. पंतप्रधान मोदींसोबत सर्व खेळाडूंचे फोटोशूटही झाले(PTI)
इतर गॅलरीज