India vs Afghanistan 2nd T20I: इंदूरमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात रविवारी दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
(1 / 4)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज इंदूरमध्ये दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
(2 / 4)
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याचा टप्पा गाठणारा रोहित शर्मा जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू ठरला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याच्या बाबतीत रोहितच्या आसपास कोणीही नाही.
(3 / 4)
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्यात रोहित शर्मानंतर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण १३४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत
(4 / 4)
या यादीत आयरिश स्टार जॉर्ज डॉकरेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत १२८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत.
(5 / 4)
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत शोएब मलिक चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण १२४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत.