भारताचा रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू, ४३व्या वर्षी रचला इतिहास
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  भारताचा रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू, ४३व्या वर्षी रचला इतिहास

भारताचा रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू, ४३व्या वर्षी रचला इतिहास

भारताचा रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू, ४३व्या वर्षी रचला इतिहास

Jan 27, 2024 08:46 PM IST
  • twitter
  • twitter
  • Rohan Bopanna : भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार मॅट एबडॉनने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी यांचा पराभव केला. विशेष म्हणजे बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमधून भारतीय चाहत्यांसाठी आज खूपच गोड बातमी आली. रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेनने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि वावसोरी यांचा पराभव केला. विशेष म्हणजे रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
twitterfacebook
share
(1 / 7)
ऑस्ट्रेलियन ओपनमधून भारतीय चाहत्यांसाठी आज खूपच गोड बातमी आली. रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेनने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि वावसोरी यांचा पराभव केला. विशेष म्हणजे रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.(REUTERS)
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात बोपण्णा आणि एबडेन या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी यांचा ७-६ (७-०), ७-५ असा पराभव केला.
twitterfacebook
share
(2 / 7)
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात बोपण्णा आणि एबडेन या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी यांचा ७-६ (७-०), ७-५ असा पराभव केला.(AFP)
रोहन बोपण्णापूर्वी, ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू नेदरलँडचा जीन-ज्युलियन रॉजर होता. जीन ज्युलियन रॉजरने वयाच्या ४० वर्षे ९ महिन्यांत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
twitterfacebook
share
(3 / 7)
रोहन बोपण्णापूर्वी, ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू नेदरलँडचा जीन-ज्युलियन रॉजर होता. जीन ज्युलियन रॉजरने वयाच्या ४० वर्षे ९ महिन्यांत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.(AFP)
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात बोपण्णा आणि एबडेन या जोडीला इटलीच्या सिमोन बोलेली आणि वावासोरी यांच्याकडून कडवी टक्कर मिळाली. पहिला सेट टायब्रेकरपर्यंत गेला. बोपण्णा आणि एबडॉन जोडीने टायब्रेकरमध्ये एकही गेम गमावला नाही. हा अंतिम सामना १ तास ३९ मिनिटे चालला. 
twitterfacebook
share
(4 / 7)
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात बोपण्णा आणि एबडेन या जोडीला इटलीच्या सिमोन बोलेली आणि वावासोरी यांच्याकडून कडवी टक्कर मिळाली. पहिला सेट टायब्रेकरपर्यंत गेला. बोपण्णा आणि एबडॉन जोडीने टायब्रेकरमध्ये एकही गेम गमावला नाही. हा अंतिम सामना १ तास ३९ मिनिटे चालला. (AFP)
यापूर्वी रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन यांनी उपांत्य फेरीत टॉमस मखाच आणि झांग झिझेन यांचा पराभव केला होता. या विजयानंतर बोपण्णा-एबडेन ही जोडी पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत नंबर-वन जोडी बनली होती.
twitterfacebook
share
(5 / 7)
यापूर्वी रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन यांनी उपांत्य फेरीत टॉमस मखाच आणि झांग झिझेन यांचा पराभव केला होता. या विजयानंतर बोपण्णा-एबडेन ही जोडी पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत नंबर-वन जोडी बनली होती.(AFP)
ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरी स्पर्धेत रोहन बोपण्णाचा हा ६१वा सामना होता. त्याने १९ वेगवेगळ्या पार्टनरसोबत सामने खेळले आहेत. बोपण्णाने अमेरिकेच्या राजीव रामचा अनोखा विक्रम मोडला. पुरुष दुहेरीचे पहिले विजेतेपद जिंकण्यापूर्वी बोपण्णा या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. राजीव रामला पहिले पुरुष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ५८ सामने लागले. तर बोपण्णाने आपल्या ६१व्या सामन्यात हे विजेतेपद पटकावले.
twitterfacebook
share
(6 / 7)
ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरी स्पर्धेत रोहन बोपण्णाचा हा ६१वा सामना होता. त्याने १९ वेगवेगळ्या पार्टनरसोबत सामने खेळले आहेत. बोपण्णाने अमेरिकेच्या राजीव रामचा अनोखा विक्रम मोडला. पुरुष दुहेरीचे पहिले विजेतेपद जिंकण्यापूर्वी बोपण्णा या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. राजीव रामला पहिले पुरुष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ५८ सामने लागले. तर बोपण्णाने आपल्या ६१व्या सामन्यात हे विजेतेपद पटकावले.(AFP)
तर बोपण्णा दोनदा पुरुष दुहेरीत युएस ओपनचा उपविजेता राहिला आहे. २०१० मध्ये त्याने पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हक कुरेशी आणि २०२३ मध्ये एबडेनसोबत युएस ओपनची फायनल खेळली होती. मात्र, दोन्ही वेळी त्याचा पराभव झाला आणि उपविजेता ठरला.
twitterfacebook
share
(7 / 7)
तर बोपण्णा दोनदा पुरुष दुहेरीत युएस ओपनचा उपविजेता राहिला आहे. २०१० मध्ये त्याने पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हक कुरेशी आणि २०२३ मध्ये एबडेनसोबत युएस ओपनची फायनल खेळली होती. मात्र, दोन्ही वेळी त्याचा पराभव झाला आणि उपविजेता ठरला.(AFP)
इतर गॅलरीज