'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालना मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
नुकताच बिग बॉस मराठी ५ची पत्रकार परिषद झाली. या परिषदेत रितेशला 'तुमच्या घरातील बिग बॉस कोण' असा प्रश्न विचारण्यात आला होता.
रितेशने उत्तर देत म्हणाली, “माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या घरात एकच बिग बॉस असतो…तो बॉस म्हणजे त्याची बायको. माझी मुलं बिग बॉस बघत नाहीत कारण, त्यांच्यासाठी घरात घडतं तेच बिग बॉस आहे."
पुढे तो म्हणाला, "जिनिलीया बद्दल सांगायचं झालं तर, माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडली तर मी सर्वात आधी तिलाच सांगतो. तिचं मत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मी बिग बॉस करावं ही तिची मनापासून इच्छा होती कारण, आम्ही दोघंही बिग बॉस शोचे खूप मोठे फॅन आहोत.”