सध्या सगळीकडे अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जिनिलीया यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांचा 'वेड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं आहे.
अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर, जिनिलीयाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे.
‘वेड’ धुमाकूळ घालत असतानाच या जोडीला सेलिब्रेशनसाठी आणखी एक कारण मिळालं. ते म्हणजे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली.
३ जानेवारी २००३मध्ये रितेश आणि जिनिलीयाचा ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आणि रितेश-जिनिलीया चित्रपट कारकिर्दीला २० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने दोघांनी दुहेरी सेलिब्रेशन केलं.