Pune pothole issue: पुण्यात सुरू असलेल्या पासवामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघात वाढले आहे. पालिकेतर्फे खड्डे दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असली तरी चुकीच्या दुरस्तीमुळे पुन्हा खड्डे उकरले जात आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात आला आहे.
(1 / 9)
पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यात आली आहे. मात्र, ती चुकीच्या पद्धतीने बुजवणीत आल्याने ती पुन्हा उखडली आहेत. त्याची खडी रस्त्यावर पडल्याने अपघात वाढले आहे.
(2 / 9)
पुण्यातय जोरदार पावसाने रस्त्यांची दुरवस्था होऊन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. अनेक रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. महापालिकेच्या पथ विभागाकडून खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेतली. मात्र, तात्पुरती मलमपट्टी केल्याने खड्डे दुरुस्ती करताना बारीक खडी आता रस्त्यावर पसरत आहे.
(3 / 9)
हे खड्डे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शास्त्रीय पद्धतीने खड्डे न बुजवता पालिका हाॅटमिक्स, कोल्डमिक्स, पेवर ब्लाॅकच्या माध्यमातून खड्डे दुरुस्त करत आहेत. चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजवल्याने रस्ते समतोल झाले आहे.
(4 / 9)
काही ठिकाणी मध्येच रस्ते वर आले आहेत. तर काही ठिकाणी खाली गेले आहे. पाण्यामुळे खड्ड्यातील माती रस्त्यावर येत आहे.
(5 / 9)
पुण्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. असे असले तरी अधून मधून पावसाचा सरी कोसळत असतात. पुण्यात शनिवारपासून रात्री खड्डे बुजविण्यात येत आहेत.
(6 / 9)
पुण्यातील काही पदपथांवरील ड्रेनेजची झाकणे उघडी पडली असून यामुळे पदपथावरून जात असतांना नागरिकांची गैरसोय होत आहे.
(7 / 9)
Pune --- Ganeshkind road potholes story - Siddharth ----Photo By --- Mahendra Kolhe)
(8 / 9)
सिमेंटचा वापर करून खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. तर खड्डे आणि ‘पॅचवर्क’ डांबरी मालाच्या साहाय्याने बुजविण्यात येत असून रस्त्याचे काम चांगले झाले नअसल्याने रस्त्यांची दूरवस्था कायम राहणार आहे.
(9 / 9)
पुण्यातील खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेतर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, हे काम योग्य पद्धतीने होतेय की नाही या कडे मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.