ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी लंडनमधील १० डाऊनिंग स्ट्रीट येथील त्यांच्या घरी कुटुंबासह दिवाळी साजरी केली.
(AP)ऋषी सुनक यांनी त्यांचे फोटो ईस्टाग्राम वरुन शेअर करत "माझ्या कुटुंबासोबत १० डाऊनिंग स्ट्रीट येथे दिवाळी साजरी करणे हा माझ्यासाठी एक खास क्षण आहे. यूकेमध्ये आणि जगभरात दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा!", अशी पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
(UK Prime Minister twitter)ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक १० डाऊनिंग स्ट्रीट येथे त्यांच्या घरी पत्नी अक्षता मूर्ती आणि मुलींसोबत दिवे लावून दिवाळी साजरी करत असतांनाचा टिपलेला क्षण
(AP)यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक, अक्षता मूर्ती आणि त्यांच्या मुली अनुष्का आणि कृष्णा इंग्लंडमधील साउथम्प्टन येथील वैदिक सोसायटी येथे असणाऱ्या मंदिरात देखील गेले होते. यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली.
(AP)परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि त्यांची पत्नी क्योको जयशंकर यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची लंडनमध्ये भेट घेत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
(PTI)अक्षता मूर्ती यांनी सिल्कची साडी परिधान केली होती तर ऋषी सुनक टाय आणि पांढर्या शर्टसह काळ्या पॅन्टसूट परिधान केला होता.
(AP)