Rishabh Pant Sister Sakshi Pant Engagement : टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याची बहिण साक्षी पंतची एंगेजमेंट (Rishabh Pant Sister Engagement) झाली आहे. या सोहळ्याचे फोटो ऋषभ आणि साक्षीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
(1 / 7)
साक्षी पंतची (५ जानेवारी) एंगेजमेंट झाली असून लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे. अंकित चौधरीसोबत साक्षीची एंगेजमेंट झाली आहे.
(2 / 7)
साक्षी आणि अंकित यांच्या एंगेजमेंट सेरेमनीचे काही फोटो ऋषभ पंतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.
(3 / 7)
साक्षी हिनेही तिच्या एंजेमेंटचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत साक्षीने लिहिले की, "हा आमच्या प्रेमकथेचा पुढचा अध्याय आहे."
(4 / 7)
साक्षी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर साक्षीला दीड लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. साक्षी भाऊ ऋषभ पंतपेक्षा २ वर्षांनी मोठी आहे.
(5 / 7)
ऋषभ पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्याचा गेल्यावर्षी कार अपघात झाला होता, तेव्हापासून पंत क्रिकेटपासून दूर आहे.
(6 / 7)
साक्षी आणि अंकित चौधरी यांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. दोघांच्या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
(7 / 7)
पंतने त्याच्या आईसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. साक्षी तिच्या एंगेजमेंट ड्रेसमध्ये छान दिसत आहे.