(1 / 6)जगात भारताचा वेगाने विकास होत आहे. २०२७-२८ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असं भाकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्षाच्या सुरुवातीला वर्तवलं होतं. ५ ट्रिलियन डॉलर जीडीपी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य होताच देश हे यश साध्य करेल, असे त्या म्हणाल्या होत्या. आता राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाढत्या विकासाच्या वेगामुळे ही उद्दिष्ट लवकरच भारत गाठण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारताचा नॉमिनल जीडीपी दर ६ वर्षांत दुप्पट होण्याच्या जवळपास असेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.