यंदाचा प्रजासत्ताक दिन खास ठरणार आहे. प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्यात विविध राज्ये 'महिला सक्षमीकरण' यावर चित्ररथ सादर करणार आहेत. यात विविध क्षेत्रातील महिलांची प्रगती आणि कर्तृत्व ठळकपणे दाखवण्यात येणार आहेत.
(PTI)लडाखचा चित्ररथ हा भारतीय महिला आइस हॉकी संघाचे प्रदर्शन करणार आहेत. यात लडाखच्या महिलांचा समावेश आहे.
(PTI)राजस्थानचा चित्ररथ हा राज्याच्या उत्सव संस्कृतीसह महिलांच्या हस्तकला उद्योगांच्या विकासाचे प्रदर्शन करणार आहे.
(HT Photo/Raj K Raj)हरियाणाचा चित्ररथ त्यांच्या राज्यातील महिलांना 'मेरा परिवार - मेरी पेहचान' या सरकारी कार्यक्रमाद्वारे कसे सक्षम केले जाते याची माहिती देणार आहेत.
(HT Photo/Raj K Raj)सामाजिक-आर्थिक क्षेत्रात महिलांच्या भूमिकेवर जोर देऊन, मणिपूरचा चित्ररथ हा पारंपारिक 'चरखे' वापरून कमळाच्या काड्यांपासून नाजूक तंतू आणि सूत कातणाऱ्या महिलांना दाखवणार आहे.
(HT Photo/Raj K Raj)ओडिशाचा चित्ररथ हा हस्तकला आणि हातमाग क्षेत्रात महिलांचा असलेला महत्वपूर्ण सहभाग दाखवणार आहे.
(HT Photo/Raj K Raj)छत्तीसगडचा चित्ररथ बस्तरच्या आदिवासी समुदायांमध्ये महिला वर्चस्व कसे असते याची माहिती देणार आहे.
(PTI)