75th Republic Day: ७५व्या प्रजासत्ताक दिनी अनेक राज्यांनी 'महिला सक्षमीकरण' या थीम आधारित चित्ररथ तयार केले होते. विविध क्षेत्रात महिलांची प्रगती यातून दाखवली गेली आहे.
(1 / 8)
७५व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाची झलक पाहायला मिळाली आहे. यासोबतच शिवबांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ देखील चित्ररथावर विराजमान होत्या.(PTI)
(2 / 8)
लडाखच्या चित्ररथावर ‘भारतीय महिला आइस हॉकी’ संघाचे चित्रण दिसले, ज्यात लडाखमधील महिलांचा समावेश आहे. (PTI)
(3 / 8)
राजस्थानच्या चित्ररथाने राज्याच्या उत्सव आणि संस्कृतीसह, महिलांच्या हस्तकला उद्योगांच्या विकासाचे प्रदर्शन केले.(HT Photo/Raj K Raj)
(4 / 8)
'मेरा परिवार - मेरी पेहचान' या सरकारी कार्यक्रमाद्वारे त्यांच्या राज्यातील महिलांचे सक्षमीकरण कसे केले जाते, हे हरियाणाच्या चित्ररथावरून पाहायला मिळाले.(HT Photo/Raj K Raj)
(5 / 8)
सामाजिक-आर्थिक व्यवहारांमध्ये महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर जोर देऊन मणिपूरच्या चित्ररथावर पारंपारिक 'चरखे' वापरून कमळाच्या काड्यांपासून नाजूक तंतू आणि सूत कताईत काम करणाऱ्या महिलांना दाखवले आहे.(HT Photo/Raj K Raj)
(6 / 8)
ओडिशाच्या चित्ररथावर हस्तकला आणि हातमाग क्षेत्रात महिलांचा सहभाग दाखवण्यात आला आहे.(HT Photo/Raj K Raj)
(7 / 8)
छत्तीसगडच्या चित्ररथावर बस्तरच्या आदिवासी समुदायांमध्ये असलेले महिलांचे वर्चस्व दाखवण्यात आले आहे.(PTI)
(8 / 8)
मध्य प्रदेशच्या चित्ररथावर राज्यातील कल्याणकारी योजनांद्वारे महिलांना थेट विकास प्रक्रियेत सामावून घेण्याचे राज्याचे यश दाखवण्यात आले आहे.(HT Photo/Raj K Raj)