Republic Day parade : दिल्लीत यंदा ७५ व्या प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. या दिवशी कर्तव्य पथावर होणाऱ्या ड्रेस रिहर्सल साठी रंगीत तालिम सुरू आहे. कडक्याच्या थंडीत लष्करी जवान या सोहळ्याची तयारी करत आहेत.
(1 / 7)
राष्ट्रीय राजधानीत कडाक्याची थंडी आणि पहाटेच्या धुक्यात, ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची रंगीत तालिम कार्तव्य पथ येथे सुरू आहे. (ANI)
(2 / 7)
या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संरक्षण दलातील दोन महिला तुकडी मार्च करणार आहेत. (PTI)
(3 / 7)
या एका तुकडीत सर्व महिला सैनिक असतील, ज्यात ६० लष्करातील आणि उर्वरित भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी असतील, (ANI)
(4 / 7)
दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा परेड ग्राउंडवर NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२४ मध्ये एकूण २,२७४ कॅडेट्स भाग घेतील. (PTI)
(5 / 7)
यावर्षीच्या शिबिरात एकूण ९०७ मुलींसह गर्ल कॅडेट्सचा सर्वाधिक सहभाग असेल. (PTI)
(6 / 7)
या वर्षीच्या संचलनात NCCचे २,२७४ कॅडेट कर्तव्य पथावर संचलन करणार आहेत. यावर्षी मुलींच्या कॅडेट्सचा सर्वाधिक सहभाग राहणार आहे. (PTI)
(7 / 7)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून औपचारिकपणे आमंत्रित केले आहे. (AFP)
(8 / 7)
दरम्यान, दिल्ली पोलीस प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेच्या तयारीचा एक भाग म्हणून ही रंगीत तालिम सुरू आहे. (REUTERS)