Republic Day Parade : महाकुंभची आस्था, सांस्कृतिक विविधता ; कर्तव्य पथावर दिसली 'स्वर्णिम भारत' ची झलक, Photos
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Republic Day Parade : महाकुंभची आस्था, सांस्कृतिक विविधता ; कर्तव्य पथावर दिसली 'स्वर्णिम भारत' ची झलक, Photos

Republic Day Parade : महाकुंभची आस्था, सांस्कृतिक विविधता ; कर्तव्य पथावर दिसली 'स्वर्णिम भारत' ची झलक, Photos

Republic Day Parade : महाकुंभची आस्था, सांस्कृतिक विविधता ; कर्तव्य पथावर दिसली 'स्वर्णिम भारत' ची झलक, Photos

Jan 26, 2025 06:05 PM IST
  • twitter
  • twitter
Republic Day Parade 2025 : आज भारत आपला ७६ वा प्रजास्ताक दिवस साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिवसाचे मुख्य आकर्षण कर्तव्य पथावरील संचलन राहिले. यावेळी चित्ररथाची थीम ‘स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास’ आहे. 
यंदा प्रजासत्ताक दिनी पाच हजार कलाकारांनी 'जयति जय मम : भारतम्' या संकल्पनेखाली ११ मिनिटांचे सांस्कृतिक सादरीकरण केले, ज्यात देशाच्या विविध भागांतील ४५ हून अधिक नृत्यशैली सादर करण्यात आल्या. यावेळी प्रजास्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे इंडोनिशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो होते. हे संचलन पाहून तेही भारावून गेले. 
twitterfacebook
share
(1 / 10)

उत्तर प्रदेशचा चित्ररथ महाकुंभ २०२५ - स्वर्णिम भारत हेरिटेज अँड डेव्हलपमेंटवर आधारित होता. भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कार्तव्य पथावर देशाची वैविध्यपूर्ण शक्ती आणि त्याच्या सतत विकसित होत असलेल्या सांस्कृतिक समावेशाचे दर्शन घडविणारी एकूण २६ झांकी काढण्यात आली, ज्यात १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारची १० मंत्रालये/ विभागांच्या झांक्यांचा समावेश होता.
twitterfacebook
share
(2 / 10)

आदिवासी गौरव वर्ष साजरे करण्यासाठी आदिवासी कार्य मंत्रालयाची झांकी दाखवण्यात आली. महिला व बालविकास मंत्रालयाच्या झांकीमध्ये मंत्रालयाच्या छत्रछायेखाली पोसलेल्या महिला आणि मुलांचा बहुआयामी प्रवास दाखवण्यात आला. 
twitterfacebook
share
(3 / 10)

पश्चिम बंगालच्या झांकीमध्ये पश्चिम बंगालचा 'लक्ष्मी भंडार' आणि 'लोक प्रसार प्रकल्प' दाखवण्यात आला - बंगालमधील जनजीवन सक्षम करणे आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे दाखवण्यात आले.
twitterfacebook
share
(4 / 10)

कर्तव्यपथावर भारताची वैविध्यपूर्ण शक्ती आणि सतत विकसित होत असलेल्या सांस्कृतीचे दर्शन घडले. सहभागी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची पहिली झांकी गोव्याची होती, ज्यात गोव्याचा सांस्कृतिक वारसा दाखवण्यात आला होता.
twitterfacebook
share
(5 / 10)

कर्नाटकच्या चित्ररथामध्ये लक्कुंडी : दगडी शिल्पांचे पाळणाघर दाखवण्यात आले. 
twitterfacebook
share
(6 / 10)

कर्नाटकच्या चित्ररथामध्ये लक्कुंडी : दगडी शिल्पांचे पाळणाघर दाखवण्यात आले. 

हरयाणाच्या चित्ररथात भगवद्गीतेचे प्रदर्शन करण्यात आले. युद्धभूमीवर श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
twitterfacebook
share
(7 / 10)

मध्य प्रदेशची शान असलेल्या कुनो नॅशनल पार्कचा चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आफ्रिकन चित्त्यांची प्रतिकृती चित्ररथावर होती.  
twitterfacebook
share
(8 / 10)

पंजाबचा चित्ररथ 'पंजाब ही ज्ञान आणि बुद्धिमत्तेची भूमी आहे' या थीमवर आधारित होती.
twitterfacebook
share
(9 / 10)

सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाची झांकी होती, जी भारतीय राज्यघटना, आपला वारसा, विकास आणि मार्गाचा पाया या विषयावर आधारित होती. कर्तव्य पथावर एका वेगळ्या झांकीनं सर्वांचं मन मोहून घेतलं. तो चित्ररथ म्हणजे संविधाना प्रतिकृती आणि  संविधानाचे जनक भीमराव आंबेडकर यांचा आवाज.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज