
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'महिला सशक्तिकरण' चा झलक कर्तव्य पथावर दिसली. देशात आज कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषाच्या तुलनेत मागे नाहीत. हे देशासाठी गौरवाची गोष्ट आहे.
कर्तव्य पथावरील संचलनात लडाखच्या चित्ररथात भारतीय महिला आईस हॉकी टीमची झलक सादर करण्यात आली. यामध्ये लडाखमधील महिला सामील झाल्या होत्या.
मणिपूरच्या चित्ररथात महिलांना पारंपरिक ‘चरख्याचा’ वापर करत सूत कातताना दाखवण्यात आले आहे. ही झलक खुपच अद्भूत आहे.
राजस्थान राज्याच्या चित्ररथात राज्याच्या संस्कृतीसोबत महिला हस्तशिल्प उद्योगांच्या विकासाला सादर करण्यात आले.
मध्य प्रदेशच्या चित्ररथात सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या विकासाची झलक सादर करण्यात आली.
हरियाणा राज्याच्या चित्ररथात दाखवण्यात आले की, राज्यातील महिला सरकारी कार्यक्रम 'मेरा परिवार - मेरी पहचान' च्या माध्यमातून सशक्त झाल्या आहेत.




