भारत देश आज (२६ जानेवारी) रोजी आपला ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय कुमारने टायगर श्रॉफ सोबतचा व्हिडीओ शेअर केला आणि देशभरातील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने व्हिडीओसोबत लिहिले की, ‘नवा भारत, नवा आत्मविश्वास, नवीन दृष्टी.. आता आपली वेळ आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद...जय भारत.’
(PTI)ज्युनियर एनटीआरने देखील ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले की,'आपल्या लोकशाहीला आणि भारतीय संविधानाच्या गौरवाला सलाम. ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.'
सोनाली बेंद्रे हिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिरंगी रंगाचा आउटफिट परिधान करून स्वतःचे काही फोटो शेअर केले. 'प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा', असे कॅप्शन तिने दिले आहे.
(Instagram/@iamsonalibendre)अभिनेत्री करीना कपूर-खान हिने 'लेहरा दो' गाण्यासोबत भारतीय राष्ट्रध्वजाचा व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये 'प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद.'
(Instagram)माधुरी दीक्षित हिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली आहे, ज्यामध्ये 'प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. न्याय या मूल्यांचा अंगीकार करून प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा करूया', असे लिहिले होते,
(Instagram)'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा.. #RepublicDay', म्हणत सुनील शेट्टीनेही आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
(Instagram/@suniel.shetty)शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या हातात राष्ट्रध्वज धरून अभिमानाने तो फडकवताना दिसत आहे. तिने तिच्या या पोस्टला कॅप्शन देत ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
(AFP)