Renault Rafale SUV: फ्रेन्च निर्माता कार रेनॉल्टने त्यांची नवीन एसयूव्ही कार राफेल जागतिक बाजारात लॉन्च केली आहे. या कारच्या फिचर्सबाबत जाणून घेऊयात.
(1 / 5)
रेनॉल्टच्या राफेल कूप एसयूव्हीमध्ये स्लोपिंग रुफलाईनसह लांब बोनेट, रुंद एअरव्हेंट, मॅट्रिक्स एलईडी लाइट्सचा सेटअप, ब्लॅक आऊट ग्रिलसह बाहेरील भाग उत्तम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
(2 / 5)
रेनॉल्ट राफेल कूप एसयूव्ही नवीन डिझाइनची अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत.
(3 / 5)
या कारच्या आतील भागात पॅनोरॅमिक सनरूफ, फ्लॅट बॉटम मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, एअरबॅग्ज, ABS, EBD आणि ADAS सारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
(4 / 5)
रेनॉल्ट राफेल कूप एसयूव्हीला ऑल व्हील ड्राइव्ह आणि प्लग इन हायब्रिडचा पर्यायही मिळेल. या कारची टॉप स्पीड २०० किलोमीटर प्रति तास इतका असेल.
(5 / 5)
रेनॉल्ट राफेल कूप एसयूव्ही २०२४ किंवा २०२५ च्या सुरुवातीला भारतात लॉन्च होऊ शकते. या कारची किंमत भारतीय चलनात सुमारे 50 लाख रुपये असू शकते.