काही नाती काळानुसार अधिक मजबूत होतात, तर कधी कधी काही नाती दिवसेंदिवस कमकुवत होऊन तुटण्याच्या स्थितीला जाऊन पोहोचतात. जर तुम्हाला अचानक कळले की तुमचा प्रियकर तुमच्याशी ब्रेकअप करू इच्छित आहे, तर तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु, जर तुम्हाला आधीच शंका असेल की तुमचा प्रियकर तुमच्याशी संबंध तोडू इच्छित असेल तर तुम्ही त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होऊ शकता. आपण आज याबाबतच जाणून घेणार आहोत.
(pexel)
छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण- जोडप्यांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होणे सामान्य आहे. तुम्ही अनेकदा तुमच्या पालकांना एकमेकांशी वाद घालताना पाहिले असेल. पण, जेव्हा हे भांडणे विनाकारण वाढू लागतात,जेव्हा प्रियकर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय कमीपणा दाखवू लागतो. तेव्हा तो या नात्यापासून विभक्त होण्याचा विचार करत असणे शक्य आहे.
महत्त्व न देणे- आपण ज्यावर प्रेम करतो त्याला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व असते. जर तुम्ही एखाद्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असाल, परंतु तो तुम्हाला महत्त्व देत नाही आणि तो तुमच्या योजनांपासून मागे हटण्याचे कारण शोधत असतो. अशावेळी समजून जा कि त्याला या नात्याचा कंटाळा आला आहे. किंवा तो नाते तोडण्याच्या तयारीत आहे.
(pexel)संभाषणाचा अभाव- जर तुमचा प्रियकर तुमच्याशी संबंध तोडू इच्छित असेल तर, पहिली आणि सुरुवातीची पायरी म्हणजे संवादाचा अभाव. तासनतास चॅटिंग आणि कॉल्सवर बोलणारी एखादी व्यक्ती अचानक तुमच्या कॉलला उत्तर देणं बंद करत असेल किंवा तुमच्या मेसेजला प्रतिसाद देत नसेल, तर तो तुमच्याशी ब्रेकअप करण्याचा विचार करत असण्याची शक्यता आहे.
अंतर ठेऊन वागणे- जेव्हा कोणी कोणाशी नातेसंबंधात असते तेव्हा ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले असतात. एकमेकांना मिठी मारणे, हात पकडणे, एकमेकांचा स्पर्श अनुभवणे, या सर्व गोष्टींमुळे आपण एकमेकांवर प्रेम करत आहात हे दर्शविते. पण, जेव्हा तुमचा प्रियकर तुमच्या जवळ बसायला लाजायला लागतो, टाळायला लागतो. तुमच्यापासून अंतर ठेऊन वागत असेल तर समजा की तो नाते तोडण्याच्या तयारीत आहे.
(pexel)उणीवा शोधू लागले- जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याला जसे आहे तसे स्वीकारता. सोप्या शब्दात सांगायचे तर त्या व्यक्तीचे दोष तुम्हाला दिसत नाहीत. परंतु, जर तुमचा प्रियकर ज्याला पूर्वी तुमचे शब्द आणि कृती आवडली असेल परंतु, आता जर अचानक तो त्याच सवयी तुमच्या दोषांप्रमाणे बघू लागला तर समजा की त्याचे तुमच्यावरील प्रेम कमी झाले आहे किंवा संपले आहे आणि आता त्याला तुमच्यापासून वेगळे व्हायचे आहे.
(pexel)गोष्टी लपवणे किंवा खोटे बोलणे- नात्यात खोटे बोलले की ती नाती कमकुवत होऊ लागतात. जर तुमचा प्रियकर पूर्वीसारख्या गोष्टी शेअर करत नसेल, गोष्टी लपवू लागला किंवा खोटे बोलू लागला तर समजून घ्या की त्याला तुमच्यापासून ब्रेकअप हवा आहे.
(pexel)
एकत्र वेळ घालवण्यास टाळाटाळ करणे- जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो. पण, जर तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवणे कठीण होत असेल आणि तो तुमच्यासोबत राहणे टाळू लागला, तर समजून घ्या की त्याला तुमच्यापासून दूर राहायचे आहे. जर तुमचा प्रियकर तुमच्यासोबत दर्जेदार वेळ घालवू इच्छित नसेल किंवा हँग आउट करू इच्छित नसेल तर, नाते तोडायचे आहे हे समजून घ्या.