रियलमी १४ एक्स 5G येत्या १८ डिसेंबरला भारतात लॉन्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रियलमीने 5G फोनचा पहिला अधिकृत टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये रियलमी या फोनमध्ये मिळणाऱ्या डिझाइन, कलर व्हेरिएंट आणि उपलब्धतेचा तपशील देण्यात आला आहे.
रियलमी १४ एक्स 5G मध्ये ६.६७ इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
रियलमी १४ एक्स 5G च्या मागील बाजूस आयताकृती कॅमेरा आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये एलईडी फ्लॅश स्ट्रिपसह तीन सेन्सर आहेत. हा कॅमेरा सेटअप रियलमी १२ एक्सच्या ५० मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअपचा अपग्रेड असेल.
हा फोन ६ जीबी रॅम/ १२८ जीबी, ८ जीबी रॅम/ १२८ जीबी आणि ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येण्याची शक्यता आहे.