रिअलमी १२ प्रो मालिका येत्या २९ तारखेला बाजारात दाखल होणार आहे, ज्यात रिअलमी १२ प्रो आणि रिअलमी १२ प्रो प्लस या दोन स्मार्टफोनचा समावेश असेल.
रिअलमी १२ प्रो स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. हा फोन ब्लू आणि नेव्हिगेटर शेड्समध्ये उपलब्ध आहे. रिअलमी १२ प्रो प्लसमध्ये एक्सप्लोरर रेड एडिशन मिळत आहे.
रिअलमी १२ प्रो मध्ये स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल मिळत आहे. सेल्फीसाठी ग्राहकांना ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, प्रो प्लस स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्ललचा कॅमेरा देण्यात आला.
(Representative)Realme 12 Pro स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 प्रोसेसरसह येईल. प्रीमियम मॉडेलमध्ये Snapdragon 7S Gen 2 चिपसेट आहे. यामध्ये ५ हजार mAh ची बॅटरी असेल.