नाणेफेक हारल्यानंतर आरसीबी प्रथम फलंदाजीला उतरला आणि त्याची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार विराट कोहली बाद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले.
(AFP)१९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या एका धावेवर जोस बटलरची विकेट गमावली. बटलर खाते न उघडता मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला
(PTI)आरसीबीकडून मॅक्सवेल आणि डु प्लेसिसमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी झाली. डुप्लेसिसने ३९ चेंडूंत ६२ धावा केल्या, ज्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तर मॅक्सवेलने ४४ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या.
(PTI)आरसीबीने नऊ गडी गमावून १८९ धावा केल्या. फाफ डुप्लेसिसने ६२ आणि मॅक्सवेलने ७७ धावा केल्या. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ सहा गडी गमावून केवळ १८२ धावा करू शकला.