Actors Who Have Worked in Ramleela : रामायणातील कोणतेही पात्र साकारण्याची संधी कलाकारांना मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. पण चित्रपट आणि शो व्यतिरिक्त, खऱ्याखुऱ्या रामलीलेतही ‘या’ कलाकारांनी काम केले आहे.
(1 / 6)
बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्याची स्वतःची कथा असते. सिनेविश्वात चमकण्याआधी आणि पडद्यावर येण्याआधी प्रत्येक कलाकाराला काही ना काही संघर्षाचा सामना करावा लागतो. असे काही कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यापूर्वी रामलीलेच्या मंचावर अभिनय केला आहे. तर, काहींनी यश मिळवल्यानंतरही मान म्हणून रामलीला सुरू ठेवली. चला तर मग आज जाणून घेऊया अशाच काही कलाकारांबद्दल…
(2 / 6)
भोजपुरी चित्रपटांचा पहिला सुपरस्टार अभिनेता, रवी किशनने स्वतः एका मुलाखतीत सांगितले आहे की, तो लहानपणी रामलीलाच्या स्टेजवर काम करत होता. आज घडीला रवी किशन बॉलिवूड चित्रपटांमधील एक यशस्वी अभिनेता आणि राजकारणी देखील आहे.
(3 / 6)
रामानंद सागर यांच्या रामायणात हनुमानाची भूमिका साकारणारे कुस्तीपटू-अभिनेते दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंह याने अयोध्येच्या रामलीलामध्ये शिव आणि हनुमानाची भूमिका साकारली आहे.
(4 / 6)
हिमानी शिवपुरी यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्रीने रामलीलामध्ये शबरीची भूमिका साकारली आहे, ज्यासाठी तिचे खूप कौतुक देखील झाले.
(5 / 6)
अभिनेते रझा मुराद यांनी रामलीलामध्येही काम केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, त्यांनी रामलीलामध्ये अहिरावणची भूमिका साकारली होती, ज्यात त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.
(6 / 6)
रामानंद सागर यांच्या रामायणात हनुमानाची भूमिका साकारणारा कुस्तीपटू-अभिनेता दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंग याने अयोध्येच्या रामलीलामध्ये भगवान शिवाची भूमिकाही साकारली आहे.