गरोदर महिलांनी नेहमी काळजी घेण्याची गरज असते. डॉक्टर अनेकदा त्यांना पोषक आहार घेण्यास सांगतात. पण कधी कधी या महिलांना कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत असा प्रश्न पडतो. न्यूट्रिशनिस्ट जुही कपूरच्या सल्ल्यानुसार गरोदरपणात 'हे' पदार्थ खाणे टाळावे…
(Shutterstock)न पिकलेल्या किंवा अर्धपिकलेल्या पपईमध्ये लेटेक्स पदार्थ आणि पपेन नावाचे सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य असते. ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते आणि संभाव्यत: गर्भपात किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. पिकलेली पपई मध्यम प्रमाणात सेवन करणे सुरक्षित मानले जाते.
(Unsplash)अननसात ब्रोमेलेन हे एंजाइम असते ज्यामुळे गर्भाशय मऊ होऊ शकतो. ब्रोमेलेन अननसाच्या खोडात आणि गाभ्यात जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे महिलांनी ते खाणे टाळावे.
(Pexels)चीझ आणि दूध: अनपाश्चराइज्ड डेअरी उत्पादनांमध्ये लिस्टेरियासारखे हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे लिस्टेरिओसिस होऊ शकतो. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे.
(Shutterstock)काही अभ्यास असे सूचित करतात की जास्त एमएसजीचे सेवन केल्याने विकसनशील गर्भाच्या मेंदूवर न्यूरोटॉक्सिक प्रभाव पडू शकतो. तसेच बाळाचे वजन वाढण्याची जास्त शक्यता असते
(Unsplash/Jerome Jome)दिवसभरात केवळ २०० ग्रॅम कॉफीचे सेवन करावे. अतिसेवनामुळे गर्भात होण्याचा धोका संभवतो. तसेच बाळाच्या वजनावर याचा परिणाम होतो.
(Unsplash)गर्भधारणेदरम्यान मद्यपान करु नये. कारण यामुळे जन्मदोष आणि विकासात्मक समस्या निर्माण होऊ शकतात.
(Unsplash)